वाळूची अवैध वाहतूक : ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त
रावेर : अवैध वाळुने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली अजंदेकडून रावेरकडे येत असतांना तहसीलच्या पथकाने शासकीय विश्रामगृहाजवळ पकडल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. अवैध वाळुने भरलेले ट्रॅक्टर-ट्रॉली (एम.पी.12 एम.2468) अजंदेकडून रावेरच्या दिशेने येत असल्याची माहीती तहसील पथकाला मिळताच तहसीलदार उषाराणी देवगुणे, संजय गांधी निराधारचे नायब तहसीलदार एम.जी.खारे, नायब तहसीलदार सी.जी.पवार, मंडळाधिकारी प्रमोद ठोंबरे, तलाठी दादाराव कांबळे यांनी ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त केली. संबधित ट्रॅक्टर मालकाला दंडाची नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

