जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 753 रुग्ण आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 29 हजार 686 वर : 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी तब्बल 753 कोरोनाबाधीत आढळल्याने खळबळ उडाली असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 29 हजार 686 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 840 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 21 हजार 343 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 115
जळगाव ग्रामीण 19
भुसावळ 50
अमळनेर 87
चोपडा 74
पाचोरा 36
भडगाव 42
धरणगाव 27
यावल 38
एरंडोल 09
जामनेर 38
रावेर 14
पारोळा 96
चाळीसगाव 58
मुक्ताईनगर 27
बोदवड 18
अन्य जिल्हा 05


