भुसावळातील डॉ.मानवतकर बहुउद्देेशीय संस्थेतर्फे 52 शिक्षकांना प्रज्ञासूर्य पुरस्कार
8 रोजी पुरस्कार वितरण : महेश फालक यांना प्रज्ञासूर्य शिक्षण महर्षी तर प्रा. डॉ. सुनील नेवे यांना गुरुद्रौणाचार्य पुरस्कार
भुसावळ : डॉ.मानवतकर बहुउद्देेशीय संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुकास्तरीय प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक, शिक्षण महर्षी व गुरुद्रौणाचार्य पुरस्कार 2019 ची घेषणा करण्यात आली आहे. यात 52 शिक्षकांचा समावेश आहे. यात ताप्ती एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष महेश फालक यांना प्रज्ञासूर्य शिक्षण महर्षी तर प्रा. डॉ. सुनील नेवे यांना गुरुद्रौणाचार्य पुरस्काराने दि. 8 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता येथील आयएमए हॉल येथे सन्मानित करण्यात येणार असल्याचे संस्थाध्यक्षा डॉ. मधू मानवतकर कळवतात.
यांचा पुरस्काराने होणार सन्मान
प्रज्ञासूर्य गुणवंत शिक्षक प्रवीण मोरे (सुसाळतांडा), हर्षा पाटील (भुसावळ), सरला जवळे (सुनसगाव), संजय साखरे (खडका), रीजवानखान अजमलखान (कुर्हे पानाचे), रुपाली चौधरी (फुलगाव), दीपाली भंगाळे (सुसरी), जयश्री चौधरी (भुसावळ), मनिषा गांधेले (भुसावळ), दीपक पाटील (जोगलखोरी), आनंद सपकाळे (भुसावळ), देव सरकाटे (कंडारी), रामकृष्ण इतवारे (भुसावळ), दीपक तेली (भुसावळ), विजय पाटील (महादेवमाळ), रुपाली कोल्हे (काहुरखेडा), भावना चौधरी (भुसावळ), डॉ.जगदीश पाटील (भुसावळ), नितीन चौधरी (सुनसगाव), नीना कटलर (भुसावळ), सुरेश शिंदे (भुसावळ), सतिष कुलकर्णी (भुसावळ), शैलेंद्र महाजन (भुसावळ), रजनी अंबलकर (खडका), वैशाली जंजाळे (कुर्हेपानाचे), रुपा कुलकर्णी (वरणगाव), प्रमोद आठवले (भुसावळ), सुरेश अहिरे (तळवेल), राजेंद्र पाटील (साकरी), मनीषा पाटील(दीपनगर), श्रीपाल देसाई (भुसावळ), प्रदीप महाजन (साकेगाव), सुधीर पाटील (भुसावळ), मीना पाटील (भुसावळ), प्रा. राजेंद्र खेडकर (भुसावळ), प्रा. शरद पाटील (भुसावळ), प्रा. सुहास चौधरी, प्रा. प्रवर्णा वानखेडे, प्रा. डॉ. शुभांगी राठी (भुसावळ), प्रा. राजेंद्र भोळे (भुसावळ), प्रा. डॉ. के. के. अहिरे (भुसावळ), प्रदीप साखरे (भुसावळ), विलास पाटील (शिंदी), भास्कर पाटील (भुसावळ), प्रा. अनिकेत पाठक (भुसावळ), संजय शुक्ला (भुसावळ), अतुल भारंबे (भुसावळ), प्रा.अनिल इंगळे (किन्ही), संदीप महाजन (सुनसगाव), राजेश बडगुजर (भुसावळ), श्रीकांत कानगो (भुसावळ), प्रा.डॉ. देवेंद्र शर्मा (साकेगाव) यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.