रोटरी च्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य शिबिर आयोजनावर भर


सुधाकर सनंसे : रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचा माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर

वरणगाव : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपण अनेकजण अडचणींना सामोरे जात आहोत कोणताही आजार होण्यासाठी अस्वच्छता कारणीभूत असते. आपण सर्वांनी स्वच्छतेवर भर दिल्यास वेगवेगळ्या आजारांवरती निश्चितपणे आपण मात करू शकतो. कोरोनाच्या काळामध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केल्यास आपण कोरोना आजाराला हद्दपार करू शकतो. येणार्‍या काळात रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली, भुसावळ यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यात आरोग्य शिबिर आयोजन करण्यावर भर असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे यांनी केले. वरणगाव येथील गणपती हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्यावतीने लहान मुले, महिला यांचे मोफत रोग निदान शिबिर व व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी वरणगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, फौजदार सुनील वाणी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विलास भाटकर, गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, डॉ.पी.व्ही.पाटील, डॉ.हर्षला पाटील, डॉ.वंदना वाघचौरे, डॉ.रवींद्र माळी, रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे, माजी अध्यक्ष सुनील शिरनामे, प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर, प्रोजेक्ट चेअरमन किशोर पाचपांडे, सुनील वानखेडे, जीवन महाजन, बापू चौधरी, राजेंद्र परसे, आई सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शीलांबरी जमदाळे, आनंद महिला फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रतिभा तावडे, पंडित नेहरू विद्या मंदिर तळवेलचे पर्यवेक्षक एस.एस.अहिरे यांची उपस्थिती होती. यावेळी फॉर्टस औषध कंपनीचे सेल्स ऑफिसर शशांक शीरनामे यांच्याकडून विविध आजारावरील गोळ्या रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.

आरोग्यविषयक नियमांचे पालन करा
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा असलेला प्रभाव कमी होत आहे यासाठी महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे व त्यामाध्यमातून कोरोणाला हद्दपार करून भयमुक्तजीवन जगता येईल, असा आशावाद सहा.निरीक्षक
संदीपकुमार बोरसे यांनी व्यक्त केला.

आरोग्य शिबिर उपयुक्त
कोरोनाविषाणूच्या काळामध्ये अशा प्रकारचे आरोग्य शिबिर हे उपयुक्त असून यापुढे आपण खेड्यांमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करण्यावर भर द्यावा व या आरोग्य शिबिरातून कोरोना विषाणू बाबत जनजागृती करून ही महामारी संपवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास भाटकर यांनी सांगितले.

या उपक्रमाची व्याप्ती वाढवणार
रोटरीने क्लब ऑफ व्हॅली भुसावळ यांच्या माध्यमातून वरणगाव शहरातील नागरीकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर हा उपयुक्त कार्यक्रम असून या कार्यक्रमाला भविष्यात आपण मोठे स्वरूप देऊन शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहील यासाठी प्रयत्न करणार आहोत यासाठी आम्हीदेखील मदत करू, असे माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले. सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी तर आभार जीवन महाजन यांनी मानले




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !