पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना केंद्राचा निधी तत्काळ द्या


भुसावळात खासदार रक्षा खडसे यांच्याकडे लाभार्थींची मागणी

भुसावळ : भुसावळ शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना केंद्र शासनाकडील निधी तत्काळ द्यावा, अशी मागणी भुसावळात खासदार रक्षा खडसे यांच्याकडे करण्यात आली. रस्ता कामांच्या शुभारंभप्रसंगी खासदार शहरात आल्यानंतर माजी नगरसेवक दीपक धांडे यांच्या नेतृत्वात लाभार्थींनी त्यांची भेट घेत व्यथा मांडली.

दिड महिन्यानंतरही दखल नाही
खासदारांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, 4 सप्टेंबर 2020 रोजी लाभार्थींनी खासदाराच्या मुक्ताईनगरातील संपर्क कार्यालयात पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना केंद्र शासनाचा निधी मिळावा यासाठी निवेदन दिले होते व त्यावेळी नगरपालिका प्रशासाकडून मला पत्र पाठवा, असे खासदारांनी सूचवल्यानंतर भुसावळ मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून खासदारांना मुख्याधिकारी यांच्या सहीनिशी पत्र पाठवले परंतु तब्बल दीड महिना उलटून सुध्दा आपण केंद्र शासनाचा निधी आजपावेतो भुसावळ नगरपालिकेला प्राप्त झालेला नाही आणि त्यामुळे लाभार्थींच्या मनात केंद्र शासनाविषयी चीड निर्माण होत आहे तसेच सर्व लाभार्थी गेल्या 10 महिन्यांपासून भाड्याच्या घरात राहत असून गेल्या 10 महिन्यांपासून पाच हजार प्रती महिन्यांप्रमाणे 50 हजार रुपये आजपावेतो लाभार्थींचे फक्त भाड्यापोटी खर्च झालेले आहे. आधीच कोरोनासारख्या महामारीमध्ये काम धंदे नाही त्यातच घर भाडे भरून लाभार्थींना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा की घर भाडे भरायचे ? हा मोठा प्रश्न लाभार्थींना पडला आहे. मागणीसंदर्भात दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने मुक्ताईनगरातील संपर्क कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !