साकळीत विवाहितेचा विनयभंग तर तरुणास जमावाकडून मारहाण


यावल : तालुक्यातील साकळी येथे एका 25 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आल्यानंतर संतप्त जमावाने एकास मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली तर या घटनेतील संशयीत आरोपी असलेल्या तरुणानेदेखील जमावो मारहाण केल्याची तक्रार दिल्यावरून परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी भेट देत दोेन्ही समाजाची बैठक घेत शांततेचे आवाहन केले.

विनयभंग व मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
साकळी येथील एका भागातील 25 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आल्यानंतर संशयीत आरोपी गौरव पुरुषोत्तम माळी (36) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला तर गौरव पुरुषोत्तम माळी या तरुणाने यावल पोलिसात फिर्याद दिली की, तो रात्री घरी असताना गावातीलच सद्दाम रसूल पिंजारी, बाबा शाहरूख, तौफिक गुलाम शेख, अल्लाउद्दीन शेख, आदिल गॅरेज वाला, गुड्डू अजगर शेख, अल्तमास इकबाल शेख, परवेज नवाबोद्यीन शेख, मोसीन मास्टर या नऊ जणांनी त्याला सायंकाळी साडेसात वाजता लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मुलाला मारहाण का करीत आहात? असा जाब विचारण्यास गेलेल्या त्याच्या आईलादेखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तीन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक अरुण धनवडे हे पथकासह गावात दाखल झाले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास संजय देवरे तर दंगलीच्या गुन्ह्याचा तपास हवालदार महेबुब तडवी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !