भुसावळातील तरुणाचा खून : चौघा आरोपींना कोठडी


जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी केली घटनास्थळाची पाहणी : दोषींवर कठोर कारवाईचे मृताच्या कुटुंबियांना आश्‍वासन

भुसावळ : शहरातील पंचशील नगर भागात जुन्या वादाच्या कारणावरून 16 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या डोक्यात रॉड टाकून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री 10 वाजता घडली होती. या प्रकरणी अटकेतील चौघा आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, खुनाच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी घटनास्थळाची पाहणी करीत मयत मोहम्मद कैफ शेख जाकीर (17) यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. कुटुंबियांनी न्यायाची मागणी केल्यानंतर डॉ.मुंढे यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्‍वासन दिले.

चौघा आरोपींना पोलिस कोठडी
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी मोहम्मद कैफ शेख जाकीर (17) याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करीत त्यास मारहाण केल्याची घटना रविवारी पंचशील नगरात घडली होती. या प्रकरणी सोमवारी पहाटे खडका चौफुली परीसरातून आरोपी धम्मप्रिय उर्फ धम्मा मनोहर सुरळकर (18), समीर उर्फ कल्लू अजय बांगर (18), आश्‍विन उर्फ गोलू अजय बांगर (21), शुभम पंडित खंडेराव (18, सर्व रा.पंचशील नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली होती तर या गुन्ह्यात एक संशयीत पसार असून त्याचा कसून शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. अटकेतील आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट
मंगळवारी पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्याला भेट देत गुन्ह्याचा आढावा तसेच आरोपींबाबत माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी घटनास्थळाला भेट देत मयताच्या कुटुंबियांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी अटकेतील आरोपींबाबत माहिती देत त्यांना कठोर शासन करण्याबाबत आश्‍वासन दिले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !