भुसावळात बंद घर फोडले : दुचाकीही लांबवली
भुसावळ : महामार्गावरील साकरी फाट्याजवळील बंद घरातून चोरट्यांनी दुचाकीसह सिलिंडर लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
साकरी फाट्याजवळील रहिवासी इंदूबाई चौधरी या पुण्याला मुलाकडे काही दिवसांपासून गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घरातील दुचाकी (एम.एच.19 सी.एन.2043) तसेच गॅस सिलिंडर लांबवत घरातील सामानाची फेकाफेक केली. शेजारच्यांना मंगळवारी सकाळी घर उघडे दिसल्याने त्यांनी पुणे येथे चौधरी यांना याबाबत माहिती दिली.

