भुसावळात चहाची टपरी जळाली
भुसावळ : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील रेल्वे हॉस्पीटलसमोरील चहाची टपरी कोणी तरी समाजकंटकांनी सोमवारी रात्री जाळल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रेल्वे हॉस्पीटलसमोर भाभीजीची चहा टपरी या नावाने एक चहा टपरी आहे. या मार्गावरील रेल्वेने अतिक्रमण काढल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी या महिलेने चहाची टपरी टाकली होती, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता मात्र सोमवारी रात्री कोणीतरी टपरी पेटवल्याने सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले. यामुळे सुमारे पाच ते सहा हजार रूपयांचे नुकसान झाले.

