गोंदे दुमालानजीक अपघात : नाशिकचे तिघे ठार
इनोव्हाचे टायर फुटून वाहन ट्रकवर आदळले
नाशिक : इनोव्हा कारचे टायर फुटून वाहन ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात नाशिकमधील तिघे ठार तर दोघे जखमी झाले. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात नाशिक-मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथील प्रभू धाब्यासमोर झाला. रोहित शिवाजी पवार (27 रा. अभिमन्यू अपार्टमेंट शिंगाडा तलावाजवळ, नाशिक), प्रफुल्ल धनंजय प्रभू (22 रा.अभिमन्यू सोसायटी शिंगाडा तलावाजवळ, नाशिक) व दानिश जनाउद्दीन सिद्दिकी (22, रा. शंकर नगर, द्वारका नाशिक) अशी मयतांची नावे आहेत.
टायर फुटल्याने अपघात
नाशिक येथील पाच जण मुंबईहून इनोव्हा कार (एम.एच.15 डी.सी. 7160 ने) नाशिककडे परतत असताना गोंदेदुमाला जवळ इनोव्हा कारचे टायर फुटल्याने ती दुभाजकावरून थेट नाशिककडून मुंबईकडे जाणार्या ट्रक (एम.पी.09 एच.एच. 7659) वर आदळली. कारचा चुराडा होवून चालक साहिल दिनेश रावल व गणेश (बंटी) व अनिल पवार हे दोघे जखमी झाले.