पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू : लासुर्यातील घटना

मलकापूर : नदित पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील लासुरा शेत शिवारात सोमवारी घडली. या घटनेत दीपक जयपालसिंह राजपूत (29) व सागर विक्रम तोंगळे (27) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिीकांनी नदीपात्र कडे धाव घेऊन बुडालेल्या दोन्ही युवकांना बाहेर काढले. मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. या घटनेने लासुरा गावावर शोककळा पसरली.




