राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टिका केली नाही : माजी मंत्री खडसे


मुक्ताईनगर : कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका केली आता त्याच पक्षात जात असल्याच्या प्रश्‍नावर माजी मंत्री खडसेयांनी सूचक विधान करीत मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कधी टीका केलेली नाही. मी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारवर टीका केली, त्यावेळी मी राज्याचा विरोधी पक्षनेता होतो, असे खडसे म्हणाले. राष्ट्रवादीत निर्णय जाण्याचा निर्णय फायनल झाल्यानंतर बुधवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. खडसे म्हणाले की, गेल्या 40 वर्षात मी भाजपाचे काम केले. भाजपा जिथे पोहोचली नव्हती, तिथे आम्ही पोहोचवली. काही मिळाले, नाही मिळाले याचे दु:ख नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला व त्यांच्यामुळेच भाजपा सोडत असल्याचे खडसे म्हणाले. भाजपकडून आपल्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोडले तर एकाचाही फोन आला नाही, अशी माहितीही खडसे यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !