मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले दहा हजार कोटींचे पॅकेज फसवे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ट्विटरवरून टिका
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवत आज जाहीर केलेले पॅकेज हे अतिशय फसवे आहे. बळीराजाला अतिशय तोकडी मदत देताना त्यांनी निव्वळ बहाणे शोधले आहेत. शेतकर्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता त्यांनी जाहीर केलेली मदत ही तोंडाला पाने पुसणारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्विटरच्या माध्यमातून फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहत आहे परंतु केवळ देखावा निर्माण करून शेतकर्यांना अजिबात मदत मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
