शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या सहाय्यक अधीक्षकासह कनिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात


65 हजारांची लाच भोवली : धुळे एसीबीची कारवाई

धुळे : सातव्या वेतन आयोगाचा फरक मंजूर करून देण्यासाठी एकूण रकमेच्या 10 टक्के रक्कम अर्थात 65 हजार रुपये लाच स्वरूपात स्वीकारताना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक व कनिष्ठ लिपिक यांना अधीक्षकांच्या कक्षातच धुळे एसीबीच्या पथकाने पकडल्याने आरोग्य विभागात प्रचंड खळबळ उडाली. 22 ऑगस्ट रोजी लाचेची मागणी झाल्यानंतर बुधवार, 4 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सापळा यशस्वी झाला. सहाय्यक अधीक्षक गोपाळ पितांबर राणे (51, प्लॉट न.43/1/2, स्व.प्रल्हाद तात्या नगर, करवंद रोड, शिरपूर) व कनिष्ठ लिपिक गणेश शाम माळवे (38, रा.प्लॉट नंबर 35, गजानन कॉलनी, करवंद नाका, शिरपूर जि.धुळे) अशी अटकेतील आरोपीचे नाव आहे.

यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे, नाईक संदीप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, शरद काटके, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, सुधीर मोरे आदींच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !