मुंबईंत संततधार : आज मुंबई पॅसेंजरसह राज्यराणी व तपोवन रद्द


भुसावळ : मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून बुधवारी तीन एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या तर गुरुवारीदेखील मुंबई पॅसेंजरसह राज्यराणी व तपोवन रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतल्याने चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय होणार आहे या शिवाय तब्बल आठ गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून तब्बल 12 एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे.

आज मुंबई पॅसेंजरसह तीन गाड्या रद्द
रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार बुधवारी 11081 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनन्स गोरखपूर एक्स्पे्रस 4 रोजी रद्द करण्यात आली तर 22101 डाउन मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस 4 रोजी रद्द करण्यात आली. 12071 डाउन दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस 4 रोजी रद्द करण्यात आली तर गुरुवारी
17617 डाउन मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस 5 रोजी रद्द करण्यात आली तर 22102 डाउन मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस 5 रोजी रद्द करण्यात आली. 51153 डाउन मुंबई-भुसावळ पॅसेंजर 5 रोजी रद्द करण्यात आली. 12072 अप जालना-दादर राज्यराणी एक्सप्रेस 5 रोजी रद्द करण्यात आली. दरम्यान, अप 11082 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनन्स एक्स्प्रेस 6 रोजी रद्द करण्यात आली आहे.

तीन दिवस आठ गाड्या शॉर्ट टर्मिनेट
12140 अप नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस 3 रोजी ठाण्यापर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. 12139 डाउन मुंबई-नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस 4 रोजी नागपूरपर्यंत चालवण्यात येईल. 11402 अप नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस 4 रोजी मनमाडपर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली तर 7618 अप नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस 4 रोजी नाशिक रोड पर्यंत चालवण्यात येणार आहे. 15018 अप गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनल्स काशी एक्सप्रेस 3 रोजी नाशिक रोडपर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. 12335 अप भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल्स काशी एक्सप्रेस 3 रोजी नाशिक रोडपर्यंत चालवण्यात येणार आहे. 12336 डाउन लोकमान्य टिळक भागलपूर एक्स्प्रेस 5 रोजी नाशिक रोड ते भागलपूरदरम्यान चालवण्यात येणार आहे. 15017 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनल्स गोरखूपर एक्स्प्रेस 5 रोजी ईगतपुरी ते गोरखपूर दरम्यान चालवण्यात येणार आहे.


कॉपी करू नका.