जळगावात शिक्षक पुरस्कार यादीचा घोळ : शिक्षक दिनी पुरस्कार वितरण सोहळा रद्द


राजकीय हस्तक्षेपामुळे नावे बदलल्याची चर्चा ; पारदर्शी पद्धत्तीचा अभाव

जळगाव : शिक्षकदिनाचे औचित्य साधून गुरुवारी जिल्ह्यातील शिक्षकांना देण्यात येणारा पुरस्कार वितरण सोहळा रद्द करण्याची नामुष्की जिल्हा परीषदेवर ओढवली. शिक्षक पुरस्काराच्या नावांना अंतिम मंजुरीसाठी विभागीय कार्यालयात तोंडी मान्यता मिळाली असलीतरी सदस्य व पदाधिकारी यांच्यातील वादामुळे हा सोहळा रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पुरस्काराच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना मध्यरात्रीपर्यंतही आपली नावे कळू शकली नाही तर आपल्या गटातील व मर्जीतील शिक्षकांची नावे समाविष्ट होण्यासाठी यादी दोन वेळा बदलण्यात आल्याची चर्चा आहे.


कॉपी करू नका.