अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणारा आरोपी जाळ्यात


जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; पुण्यातून आवळल्या आरोपीच्या मुसक्या

जळगाव – दहा वर्षीय अल्पवयीन बालिकेस पळवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी राजु दयाराम बारेला (24, ह.मु. गवला, ता.चैनपूर, जि.खरगोन, मध्यप्रदेश) यास बालिकेसह पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. घराबाहेर खेळणार्‍या बालिकेला आरोपीने 17 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता पळवून नेले होते. बालिकेचा शोध घेवूनही न आढळल्याने जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यातून आवळल्या मुसक्या
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या नेतृत्वात सहा.पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांच्यासह हवालदार विजय पाटील, संजय सपकाळे, सुरेश महाजन, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे एएसआय मगन मराठे, प्रफ्फुल्ल धांडे यांनी आरोपी राजू बारेला याच्यासह अल्पवयीन बालिकेला पुण्यातून ताब्यात घेतले. बालिकेची तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने राजू बारेला याच्याविरुध्द 376 (अ .ब), 506 सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियमचे (पोकसो)कलम 3,4,5 (एम)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक कदीर तडवी करीत आहेत.


कॉपी करू नका.