फडणवीस सरकारच्या काळातील थकीत वीज बिलांची होणार चौकशी


ठाकरे सरकारचा झटका : वीज बिलांवरून राजकारण पेटले

मुंबई : कोरोनाच्या काळातील वाढीव वीज बिलांवरून राज्यात राजकारण तापले असतानाच ठाकरे सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील थकील वीज बिलांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गुरूवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिलांची थकबाकी कशी वाढली ? यासंदर्भातील चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. एकीकडे भाजप आणि मनसे हे दोन्ही पक्ष वाढीव वीज बिलांच्या मुद्यांवरून आक्रमक होत असताना, दुसरीकडे ऊर्जामंत्र्यांनी उल्लेख केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारच्या काळातील वीज बिलांच्या थकबाकीसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !