मलकापुरातील पत्रकार नंदकिशोर वर्मांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध


हल्ला करणार्‍या युवकांवर कारवाई हवी : पत्रकार संघटनेच्या वतीने मागणी

मलकापूर- पत्रकार नंदकिशोर वर्मा यांना 4 सप्टेंबर 2019 रोजी सायंकाळी सात सुमारास अज्ञात दोन युवकांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी व चापटांनी मारहाण केल्याची घटना मलकापूरात घडली होती. या घटनेचा गुरुवारी मलकापूर शहर, तालुका पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आलाण अज्ञात दोन्ही युवकांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी, मलकापूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी पत्रकार हनुमान जगताप, गजानन ठोसर, संदीप सावजी, विलास खर्चे, श्रावण पाटील, समाधान सुरवाडे, स्वप्निल आकोटकरश विनायक तळेकर, किशोर सोनवणे, अजय टप, धनराज तळेकर, सतीश दांडगे, उल्हास शेकोकार, संदीप शुक्ला, अशोक रवणकार, बलराम बावस्कार, नथ्थुजी हिवराळे, कैलास काळे, राजेश इंगळे, धीरज वैष्णव, दिलीप कंडारकर, करणसिंग सिरसवाल, भिवा चोपडे, प्रशांत उंबरकर, भूषण बक्षी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.


कॉपी करू नका.