पांझरा नदीच्या पुरात वाहिल्याने मांजरीच्या इसमाचा मृत्यू


पुरामुळे धुळ्यातील पूल वाहतुकीसाठी बंद

साक्री- साक्री तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने पांझरा नदीतील पूर आल्याने मांजरी येथील मुंग्या बुधा बिलकुळे (56) हे सोमवारी रात्री पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. बराचवेळ शोध घेतल्यानंतर अखेर त्यांचा मृतदेह हाती लागला. दरम्यान, साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात झालेला मुसळधार पाऊस आणि या भागातील लहान-मोठी धरणे ओसंडल्यामुळे पांझरा नदीला पूर आला आहे तर धुळ्यानजीकचा बायपासवरील पूल, शहरातील मोठा पूल आणि कुमारनगरातील पूल वगळता पांझरेवरील चारही पूल वाहतुकीसाठी बंदच करण्यात आले आहेत. परीणामी अन्य तीन मोठ्या पुलावरील वर्दळ वाढली आहे. बंद करण्यात आलेल्या पुलांच्या डागडूजीनंतर प्रशासनाकडून हे पूल वापरयोग्य असल्याची चाचणी झाल्यानंतर ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


कॉपी करू नका.