भुसावळातील अपहृत तरुणी मुंबईत विवाहबद्ध


भुसावळ : शहरातील 25 वर्षीय तरुणीचे चारचाकीतून अपहरण झाल्याची तक्रार भुसावळ बाजारपेठ पोलिसात दाखल करण्यात आली होती. बाजारपेठ व जळगाव गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना या तरुणीने मुंबईत विवाह केल्याचे निष्पन्न झाले असून चुनाभट्टी पोलिस ठाणे, कुर्ला, मुंबई येथे जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाला कायदेशीर लग्न केल्याने पतीसोबत मुंबईत राहणार असल्याचा जवाब लिहून दिला आहे.

गुन्हे शाखेने लावला तरुणीचा छडा
18 जून 2020 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील 25 वर्षीय तरुणीचे चारचाकी वाहनातून अपहरण केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, अनिल मोरे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, विजय पाटील, नरेंद्र वारूळे, दिनेश बडगुजर, समाधान पाटील, प्रशांत परदेशी यांनी कुर्ला येथे जावून तरुणीचा शोध घेतला असता तिने पोलिसांना आपला कायदेशीर विवाह झाल्याचे सांगत पतीच्या सोबत राहण्याचा जवाब लिहून दिल्याने पथक जळगावात रीकाम्या हाती परतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !