यावल तालुक्यात रोहयो अंतर्गत बोगस कामांची चौकशी करा


जिल्हाधिकारी प्रसाद मते यांच्या आदेशाने तालुक्यात उडाली खळबळ

यावल : तालुक्यातील विविध गावांमध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्याने या तक्रारींची तत्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी यावल गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. या आदेशाने निकृष्ट काम करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी
या संदर्भात प्रसाद मते यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील उंटावद, पिळोदा, मनवेल, निमगाव, राजोरा, अंजाळे, वाघळुद, मारूळ, सांगवी बु.॥, चिखली खु.॥, अट्रावल या ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेंंतर्गत होत असलेल्या वॉल कम्पाउंडच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर बोगस मजुरांची नोंदणी करून निकृष्ट कामे करण्यात आल्याच्या लिखीत तक्रारी यावल तालुक्यातील सामाजिक संघटनेच्या माधमातून करण्यात आल्याने याबाबबत तत्काळ दखल घेवून यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.निलेश पाटील यांनी तत्काळ या सर्व गावांच्या कामांची नियमानुसार मुदतीच्या आत चौकशी करावी व कारवाईचा अहवाल जळगाव कार्यालयास पाठवावा, असे आदेशात नमुद केले आहे. रोहयोचे उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यवाहीच्या आदेश प्राप्तीने भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या बांधकाम अभियंते तथा ठेकेदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !