यावल शहरात कुष्ठरोग व क्षयरोग रूग्ण शोध मोहिम


यावल : शहरात कुष्ठरोग, क्षयरोग शोध मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले जात असून 1 डिसेंबरपासून शोध मोहिम सुरूवात करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक घरातील नागरीकांची तपासणी व त्यांच्यात जनजागृती केली जात आहे. 1 डिसेंबरपासून क्षयरोग व कृष्ठरोग संदर्भात सर्वेक्षण शहरात सुरू आहे.

कुष्ठरोगाबाबत जनजागृती
तालुका आरोग्याधिकारी डॉ.हेमंत बर्‍हाटे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक स्वयंसेवक यांच्या माध्यमातून शहरात सर्वेक्षण सुरू आहे. यात प्रत्येक कुटुंबनिहाय घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेतली जात असून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना क्षयरोग कुष्ठरोग संदर्भातील लक्षणे आणि उपचार पद्धती संदर्भातली माहिती देऊन जनजागृती देखील केली जात आहे. एकूणच हा उपक्रम यशस्वीतेसाठी आरोग्य प्रशासन परीश्रम घेत आहेत. शहरात वैद्यकीय सेवक रविकांत गोरे, तेजस बडगुजर, मीनाक्षी डांबरे, जयेश बैरागी आदींच्या पथकाकडून सर्वेक्षण सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !