मुंबई-नागपूर दरम्यान विशेष उत्सव गाड्या धावणार


भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-नागपूर (साप्ताहिक) नागपूर-मुंबई सुपर फास्ट उत्सव विशेष गाडी वन वे फेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-नागपूर सुपर फास्ट उत्सव विशेष गाडी
डाऊन 02049 मुंबई ते नागपूर उत्सव गाडी दिनांक 25 डिसेंबर ते 29 जानेवारीदरम्यान दर शुक्रवारी मुंबईहून 7.555 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी नागपूरला 10.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 02050 नागपूर ते मुंबई उत्सव गाडी 27 डिसेंबर ते 31 जानेवारीदरम्यान दर रविवारी नागपूरहून 4.30 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी मुंबई स्टेशनला 6.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, मूर्तितापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन द्वितीय वातानुकूलित, पाच तृतीय वातानुकूलित, सात शयनयान, दोन द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहेत.


नागपूर-मुंबई सुपर फास्ट उत्सव विशेष गाडी वन वे फेरी
अप 02048 नागपूर ते मुंबई उत्सव गाडी गुरुवार, 24 डिसेंबर रोजी नागपूर येथे सहा वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी मुंबई स्थानकावर 7.45 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी मिळणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !