भुसावळ मनसे शहराध्यक्षांसह 10 जणांविरुद्ध गुन्हा
भुसावळ : महामार्गा जवळील उड्डानपुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी लावलेले पोस्टर काढल्यावर मनसेने 16 डिसेंबरला दुपारी 12 वाजता महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. जिल्हाधिकार्यांचा जमावबंदीचा आदेश धुडकावून आंदोलन केल्याने बाजारपेठ पोलिस ठाण्यात शहराध्यक्ष विनोद पाठक यांच्यासह 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल झाला. गोपनीय विभागाचे सचिन पोळ यांनी फिर्याद दिली. हवालदार जयराम खोडपे तपास करत आहे.

