जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 27 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 55 हजार 355 वर : आतापर्यंत 53 हजार 685 रुग्णांची कोरोनावर मात तर आतापर्यंत 1317 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे 27 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 355 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 53 हजार 685 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 317 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी 28 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 14
जळगाव ग्रामीण 01
भुसावळ 00
अमळनेर 03
चोपडा 00
पाचोरा 00
भडगाव 02
धरणगाव 02
यावल 00
एरंडोल 00
जामनेर 00
रावेर 00
पारोळा 02
चाळीसगाव 05
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 00





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !