भुसावळात आयशर ट्रकच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू
भुसावळ : शहरातील काच बंगल्याजवळ आयशर वाहनाने धडक दिल्याने 35 वर्षीय अनोळखी युवकाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर आयशर चालकाला वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघातात मयत झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटली नसल्याचे शहर पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. राजू पाटील हा चालक नागपूरकडे केमिकल घेऊन जाणारा आयशर ट्रक (क्रमांक एम.एच.18-बी.ए.0629) घेवून जात असताना चुकून जळगाव रस्त्याने शहरात येत असताना काच बंगल्याजवळ एका पादचार्याला वाहनाचा धक्का लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक संदीप दुणगहू व सहकार्यांनी घटनास्थळ गाठले.


