राज्यभरातील मका खरेदी केंद्रांना मुदतवाढ मिळावी
खासदार रक्षा खडसे यांची राज्य शासनाकडे मागणी
भुसावळ : केंद्र सरकारद्वारे महाराष्ट्र राज्यात शासनाच्या आधारभूत किंमतीवर आधारीत शासकीय मका खरेदी केंद्र सुरु होती परंतु केंद्र सरकारचे अडीच लाख क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शासनातर्फे महाराष्ट्रातील सर्व शासकीय मका खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश 18 डिसेंबर रोजी काढण्यात आले होते मात्र महाराष्ट्रातील बर्याच शेतकर्यांनी मका खरेदी बाबत शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केली असून त्यांच्याकडील मक्याची शासनाकडून खरेदी झालेली नाही. याबाबत ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांच्याशी खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्रव्यवहार केला आणि मंत्री महोदयांशी दूरध्वनीवरून चर्चाही केली. ाज्य सरकारने शासकीय मका खरेदी मुदत वाढ मिळण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव सादर केला नसल्याने ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकर्यांचा मका खरेदी होण्याबाबत शासकीय मका खरेदी केंद्राला मुदत वाढ मिळण्यासाठी राज्य सरकारकडून तत्काळ केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याबाबत संबंधितांना आदेश देण्यात यावे, अशी विनंती खासदार रक्षाताई खडसे यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना केली आहे.

