लोकमान्य टिळक टर्मिनस ते हरीद्वार विशेष गाडी रद्द


भुसावळ : वातावरणातील बदलामुळे लोकमान्य टिळक टर्मिनस-हरीद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे. डाऊन 02171 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते हरीद्वार विशेष गाडी 21 डिसेंबर ते 28 जानेवारीदरम्यान रद्द करण्यात आली आहे. अप 02172 हरीद्वार ते लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 22 डिसेंबर ते 29 जानेवारीदरम्यान प्रस्थान स्टेशनपासून रद्द करण्यात आली असून रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !