जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 46 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 55 हजार 401 वर : एकाच दिवसात 36 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे 46 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1319 रुग्णांचा मृत्यू ओढवला तर गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 401 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 53 हजार 721 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर सोमवारी एकाच दिवसात 36 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

सोमवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 21
जळगाव ग्रामीण 00
भुसावळ 06
अमळनेर 00
चोपडा 05
पाचोरा 02
भडगाव 00
धरणगाव 01
यावल 01
एरंडोल 01
जामनेर 01
रावेर 02
पारोळा 03
चाळीसगाव 03
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 00


24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मयतांमध्ये जळगाव शहरातील 27 वर्षीय पुरूषासह भुसावळ तालुक्यातील 80 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. कोरानामुळे आतापर्यंत 1319 जणांचा मृत्यू ओढवला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !