लग्नाच्या नावाखाली फसवणूक : पसार वधूसह तिघांविरुद्ध गुन्हा


फैजपूर : लग्न जुळवून देण्याच्या माध्यमातून दिड लाखांची रक्कम उकळल्याप्रकरणी पसार वधूसह तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमोद भागवत तेली (29, पाडळसा) या प्रकरणी फैजपूर पोलिसात तक्रार दिली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदार प्रमोद यांचा विवाह 31 ऑक्टोबर रोजी पाडळसा येथे रूपाली नामक तरुणीशी झाला. या विवाहासाठी मध्यस्थ अशोक चौधरी व रेश्मा रफिक खान यांनी दीड लाख रुपये घेतले मात्र लग्नाच्या सहा दिवसांनी नवधूची कथित मावस बहिण रेश्मा उर्फ मीना यांनी वधू रूपालीच्या आईची तब्येत बरी नसल्याने तिला आईला भेटण्यासाठी घेऊन जाते, असे सांगून दोघे घरून निघाल्या मात्र परतल्याच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रमोद तेली यांनी फैजपूर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून अशोक कडू चौधरी (कुंभारखेडा, ता.रावेर), रेश्मा रफिक खान (मीना, शाहनगर नगर औरंगाबाद) व रूपाली (खरे व पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे व हेड कॉन्स्टेबल सुधाकर पाटील करीत आहे. दरम्यान, आरोपींविरुद्ध चाळीसगाव व धरणगाव येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !