वास्को-दि गामा व पटना विशेष गाडीच्या वेळेत बदल


भुसावळ : अप हजरत निजामुद्दीन-वास्को दि गामा व अप पटना वास्को दि गामा विशेष गाडीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दोन्ही गाड्या भुसावळ विभागातून धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हजरत निजामुद्दीन-वास्को दि गामा विशेष गाडी
अप 02780 हजरत निजामुद्दीन-वास्को दि गामा विशेष गाडी प्रस्थान स्थानकापासून 23 डिसेंबर रोजी ही गाडी खंडवा स्थानकावर 6.58 वाजता, भुसावळ स्थानकावर 8.45 वाजता, जळगाव स्थानकावर 9.23 तर मनमाड येथे 11.15 वाजता ही गाडी पोहोचेल. डाऊन 02779 वास्को दि गामा हजरत निजामुद्दीन विशेष गाडी प्रस्थान स्टेशनपासून 23 डिसेंबरपासून मनमाड स्थानकावर 10.30 वाजता, जळगाव स्थानकावर 12.23 वाजता, भुसावळ स्थानकावर 12.55 वाजता, खंडवा स्थानकावर 2.57 वाजता पोहोचेल.


पटना वास्को दि गामा विशेष गाडी
अप 02742 पटना वास्को दि गामा विशेष गाडी प्रस्थान स्टेशनपासून 26 डिसेंबरपासून खंडवा स्थानकावर 7.58 वाजता, भुसावळ स्थानकावर 10 वाजता, मनमाड स्थानकावर 12.37 वाजता, नाशिक स्थानकावर 1.40 वाजता, पोहोचणार आहे. डाऊन 02741 वास्को दि गामा पटना विशेष गाडी प्रस्थान स्टेशनपासून 23 डिसेंबरपासून नाशिक स्थानकावर 10.15 वाजता, मनमाड स्थानकावर 11.05 वाजता, भुसावळ स्थानकावर 1.40 वाजता व खंडवा स्थानकावर 3.47 वाजता पोहोचणार आहे. दरम्यारन, केवळ आरक्षिर्त तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !