ग्रामपंचायत निवडणूक : यावल तहसीलला आले यात्रेचे स्वरूप
यावल : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडणीसाठी तहसील कार्यालयात नागरीकांनी एकच गर्दी केल्याने तहसील कार्यालयास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
47 ग्रामपंचायतींच्या निवडणूक
यावल तालुक्यातील या निवडणुकीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची निवडणूक प्रक्रिया संदर्भातील महत्वपुर्ण बैठक यावल येथे पार पडली. यावल तालुक्यातील डांभुर्णी, पिळोदे खुर्द, किनगाव बु.॥, मारूळ, भालशीव, अंजाळे ग्रुप, बामणोद, सांगवी खुर्द, निमगाव ग्रुप, भालोद, राजोरे, हिंगोणा, नावरे, दहिगाव, वढोदे प्रगणे यावल, डोणगाव, आडगाव, मोहराळे, कोसगाव, बोरावल बु.॥, अट्रावल, वनोली, आमोदे, बोरखेडा बु.॥, सांगवी बु.॥, पिंपरूड, उंटावद, पिंप्री, विरावली, बोरावल खुर्द, नायगाव, सावखेडासीम, टाकरखेडा, कोळवद, वढोदे प्रगणे, सावदा, सातोद, वड्री खुर्द, हंबर्डी, मनवेल, कोरपावली, महेलखेडी, कासवे गु्रप, दुसखेडा, डोंगरकठोरा, विरोदे, चिंचोली, शिरसाड अशा एकूण 47 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक पंचवाषिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 15 जानेवारीला 217 मतदान केंद्रांवर 469 भावी ग्रामपंचायतीच्या कारभारींच्या निवडीसाठी मतदान होणार आहे. 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

तहसील कार्यालयात बैठक
तहसील कार्यालयात तहसीदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांची निवडणूक प्रकीये संदर्भात प्रशिक्षण व प्रात्यक्षिक मार्गदर्शन संदर्भातील सविस्तर माहिती उपस्थित सर्व अधिकारी वर्गास अवगत करण्यात आली.

