भुसावळात साडेचार हजारांचा गुटखा जप्त : दोघांना अटक
भुसावळ : राज्यात प्रतिबंधीत असलेल्या विमल गुटख्याची खडका रोड भागात विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी दुपारी 4.20 वाजता कारवाई करीत दोघांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून प्रतिबंधीत चार हजार 356 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पानटपरी चालक तौफिक खान लुकमान खान (31, खडका रोड, लाल बिल्डींगजवळ,भुसावळ ता – भुसावळ) व शेख शोएब शेख मनु (28, खडका रोड, लाल बिल्डीग जवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
ही कारवाई बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, विकास सातदिवे, चेतन ढाकणे, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली. पथकाने खडका रोडवरील पानटपरीत प्रतिबंधीत केशरयुक्त विमल पान मसाल्याचे 22 पाकिटे तसेच सुगंधीत तंबाखुचे 44 पाकिटे मिळून चार हजार 356 रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला.


