ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास 21 लाखांचा निधी देणार
आमदार संजय सावकारे यांची घोषणा : भुसावळ तालुक्यात 26 ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला बुधवारपासून प्रारंभ झाला असून इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग देत निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे तर दुसरीकडे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केल्यास अशा ग्रामपंचायतींना आमदार निधीतून विकासकामे करण्यासाठी 21 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी केली आहे. बिनविरोध निवडणूक झालेल्या गावांना स्मार्ट व्हिलेज करण्यासाठी सहकार्य करण्याचया दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून जास्तीत-जास्त ग्रामपंचातींना बिनविरोध निवडणुका कराव्यात, असे आवाहन आमदार संजय सावकरे यांनी केले आहे.
भुसावळ तालुक्यात 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना सुरूवात
भुसावळ तालुक्यातील 26 ग्रामपंचातींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार तालुक्यातील कुर्हेपानाचे, साकेगाव, कंडारी, दर्यापूर, पिंपरीसेकम-निंभोरा, खडके, फेकरी, साकरी, किन्ही, मांडवेदिगर-भिलमळी, मन्यारखेडे, काहुरखेडा, पिंपळगाव बु॥., जोगलखेडा, कठोरे बु.॥, शिंदी, टहाकळी, जाडगाव, आचेगाव, बोहर्डी खु, बोहडी खु., सुसरी, बेलव्हाय, हतनुर, वांजोळे, खंडाळे, कठोरे खुर्द या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी मंगळवार, 23 डिसेंबरपासून प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

बिनविरोध ग्रामपंचायतींना 21 लाखांचा निधी : आमदारांची घोषणा
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर निवडणुकीचा खर्च वाचविण्यासाठी तसेच या खर्चातून ग्रामपंचायतींमध्ये विकासकामे करण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी तालुक्यातील बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींना आपल्या आमदार निधीतून प्रत्येक ग्रामंचायतीच्या अंतर्गत विकास कामांसाठी 21 लाख रुपयांचा निधी देण्याची घेषणा 22 रोजी पदाधिकार्यांच्या बैठकीत केली. यावेळी तालुका सरपंच परीषदेचे अध्यक्ष तथा कठोरा सरपंच प्रशांत पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती गोलु पाटील उपस्थित होते.

