भुसावळच्या ज्येष्ठ रंगकर्मी कल्पना कोल्हे यांचे निधन
भुसावळ : भुसावळच्या ज्येष्ठ रंगकर्मी कल्पना नरेंद्र कोल्हे (52) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास निधन झाले. सदैव हसतमुख व मनमिळावू असलेल्या कल्पना कोल्हे यांच्या अकाली निधनाने नाट्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. कोल्हे या बुधवारी सकाळी सात स्नानगृहात गेल्यानंतर त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
नाट्यक्षेत्रात उमटवला अवीट ठसा
ज्येष्ठ रंगकर्मी कल्पना कोल्हे यांनी अनेक नाटकांमध्ये का करून अभिनयाच्या जोरावर अनेक पारीतोषिके पटकावली होती. गृहन्नडा, चिअर्स, बाप, ऑदर साईड ऑफ मिडनाईट या नाटकांमध्ये त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आली. कोल्हे यांनी साकारलेल्या बाप या नाटकाबद्दल त्यांना राष्ट्रीय स्तरावर अभिनेत्रीचे पारीतोषिकही मिळाले होते. त्यांच्या अकाली निधनाने रंगकर्मी व नाट्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली.


