आगामी ग्रामपंचायत निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार


वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांची माहिती

भुसावळ : राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी जाहीर केले आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘अकोला पॅटर्न ’ जळगाव जिल्ह्यात राबवणार
विनोद सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जिल्ह्यातील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पक्षाध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी सोशल इंजिनिअरींग करून यशस्वी केलेला ‘अकोला पॅटर्न’ जळगाव जिल्ह्यात राबवला जाणार आहे. यासाठी ‘गाव तिथे शाखा व वॉर्ड तिथे बूथ’ हे धोरण राबलले जात असून अनेक ग्रामपंचायतीत वंचितचे सदस्य निवडून कसे येतील या बाबत नियोजन करण्यात आले असल्याचे विनोद सोनवणे यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत ज्यांना-ज्यांना वंचिततर्फे निवडणूक लढवायची असेल त्या सर्व इच्छुक उमेदवारांनी जिल्हाध्यक्ष, जिल्हा महासचिव, सर्व तालुकाध्यक्ष व तालुका सचिव यांच्याशी संपर्क साधावा, .असे आवाहन जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा सचिव संजय सुरडकर यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !