भुसाळातील हद्दपार आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
भुसावळ : हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघण करून शहरात वावर असलेल्या शम्मी प्रल्हा चावरीया (30, वाल्मीक नगर, भुसावळ) याच्या जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी हद्दपारी आदेशाचे उल्लंघण केल्याने आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही शहरात असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. सहा.फौजदार अशोक महाजन, हवालदार शरीफोद्दीन काझी, युनूस शेख रसुल, किशोर ममराज राठोड, विनोद सुभाष पाटील, रणजीत अशोक जाधव, चालक इशान आदींच्या पथकाने आरोपीला बुधवारी आरोपीला पांडुरंग टॉकीज परीसरातून अटक केली.

