भुसावळ रेल्वे रुग्णालयात सिलिंडर स्फोट : दोघे कर्मचारी गंभीर


एसीत गॅस भरतांना घडली दुर्घटना : पोलिस यंत्रणेची धाव

भुसावळ : वातानुकूलित यंत्रणेत (ए.सी.) गॅस भरताना अचानक झालेल्या सिलिंडर स्फोटात दोन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रेल्वे हॉस्पीटलकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. या दुर्घटनेत रेल्वेच्या इलेक्ट्रीक विभागातील कर्मचारी शशी शंकर व त्यांचा सहकारी अखिलेश कुमार
हे जखमी झाले असून त्यांच्यावर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस यंत्रणेची धाव
रेल्वे रुग्णालयातील दुसर्‍या मजल्यावर ऑपरेशन थिएटरच्या जवळील रूममध्ये असलेल्या एसी यंत्रणेचे
काम रेल्वेच्या इलेक्ट्रीक विभागातील कर्मचार्‍यांकडून सुरू असताना सिलींडरचा स्फोट झाला. घटनेची माहिती
मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी लगेच सहायक
पोलिस निरीक्षक संदीप दुणगहू, राजेश बोदडे, जुबेर शेख, रसीद तडवी
यांना रवाना केले. दरम्यान, रुग्णालयात पत्रकारांना
प्रवेश देण्यात आला नाही व झालेल्या घटनेबाबत माहिती देण्यात न आल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेने कर्मचारीवर्गात मोठी खळबळ उडाली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !