ग्रामपंचायत निवडणूक : 30 अर्ज दाखल
भुसावळ : भुसावळ तालुक्यात 26, रावेर तालुक्यात 48, यावल तालुक्यात 40, मुक्ताईनगर 51, बोदवड 29 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून अर्ज सादर करण्याच्या दुसर्या दिवशी गुरुवारी एकूण 30 अर्ज दाखल झाले.
भुसावळ : सात अर्ज दाखल
भुसावळ : तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशी गुरुवारी सात अर्ज दाखल झाल्याचे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी सांगितले. त्यात खंडाळे येथील मीराबाई प्रकाश पाटील (वॉर्ड एक), शालूबाई पंढरीनाथ चौधरी (वॉर्ड दोन), सतीश दगडू चौधरी (वॉर्ड तीन), खडके येथील अनिशखान लोधी (वॉर्ड तीन), रूबीना रफिक पटेल (वॉर्ड तीन), रईसखान तुराबखान लोधी (वॉर्ड तीन), फेकरी येथील मनोज तनू कदम (वॉर्ड चार) यांचा प्रत्येक एक अर्ज दाखल झाला.

यावल : एकही अर्ज दाखल नाही
यावल : तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असल्यातरी दुसर्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुक्ताईनगर : एक अर्ज दाखल
मुक्ताईनगर : तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज करण्याच्या दुसर्या दिवशी तालुक्यातील घोडसगाव येथील प्रभाग क्रमांक दोन मधील सर्वसाधारण जागेसाठी एक अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले.
बोदवड : 14 अर्ज दाखल
बोदवड : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून गुरुवारी एकूण 14 अर्ज दाखल झाले. त्यात येणगाव पाच, लोणवाडी चार, मानमोडी दोन, मनुर बु॥., हिंगणा व शेलवड येथील प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
रावेर : आठ अर्ज दाखल
रावेर : तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत असून गुरुवारी आठ अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले.

