विविध मागण्यांसाठी रीपाइंचे यावलमध्ये आंदोलन
यावल : विविध मागण्यांसाठी रीपाइंतर्फे यावल तहसीलवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. मागण्यांसंदर्भात तहसील प्रशासनाला जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
तहसील कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी
गरजू महिलांना धान्य मिळावे, विधवां महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा, घरकुलांचे थकीत अनुदान मिळावे यासह विविध मागण्यांसाठी यावल तहसील कार्यालयावर गुरुवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. प्रसंगी मोर्चेकर्यांनी जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी तहसीलदार महेश पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष ईश्वर इंगळे, यावल शहराध्यक्ष विष्णू पारधे, राजू तडवी, किरण तायडे, राहुल इंगळे, शकिल खासह रीपाइं शहराध्यक्ष विष्णू पारधे, नितीन बोरेकर, किरण तायडे, राजु तडवी, प्रमोद गजरे, प्यारा पटेल, सिध्दार्थ बोरेकर, किरण सपकाळे, विजय भालेराव, सुरेश पारधे, राजू डांबरे, प्रमोद गजरे, अर्जन बारी विनोद तायडे आदी उपस्थित होते.

