नेहते व खिरवड परीसरात चोरट्यांचा धुमाकूळ
रावेर : तालुक्यातील नेहते व खिरवड परीसरात गुरुवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत साहित्य लांबवल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. रावेर तालुक्यातील नेहते येथे किसान तोल काट्यातून अज्ञात चोरट्याने सहा हजार रुपये रोख तर शेजारीच असलेल्या केळी ग्रुपमधुन भांडे व होम थिएटर लांबवले तसेच सोपान बाबुराव पाटील यांच्या शेतातून नळ्याचे बंडल लांबवण्यात आले तसेच खिरवड येथील प्रकाश लासुरकर यांची पाण्याची मोटार चोरट्यांनी लांबवल्याने या परीसरात खळबळ उडाली आहे. रावेर पोलिसात महेंद्र पाटील नेहते (रा.रावेर) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहेत.

