सावद्यात प्रफुल्ल लोढांची प्रतिमा जाळली


माजी मंत्री एकनाथराव खडसेंवर बेछूट आरोपांचा राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी केला निषेध

सावदा : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर जामनेर येथील प्रफुल्ल लोढा यांनी शुक्रवारी बेछूट आरोप केल्याने त्याचा सावद्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी प्रतिमा जाळून व घोषणाबाजी करून
शनिवारी निषेध व्यक्त केला.

लोंढाच्या प्रतिमेला फासले काळे
बनाना सिटी शिल्पाजवळ राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेश वानखेडे, फिरोज खान पठाण, सिद्धार्थ बडगे, किशोर बेंडाळे, मीनाक्षी कोल्हे, विजया जावळे, रेखा वानखेडे, सुभद्राबाई बडगे, चारुदत्त वानखेडे, हरी मामा परदेशी, साई राज वानखडे, प्रसाद वानखेडे आदींनी लोढा यांच्या प्रतिमेला काळे फासून, चपलांनी मार देत दहन करण्यात आले. लोढा हे राष्ट्रवादीचे साधे सदस्य सुद्धा नाही. त्यामुळे त्यांनी आमचे नेते खडसे यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये कोणतेहे तथ्य नाही. यापुढे पुढच्या काळातही ते सहन केले जाणार नाही राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे खडसे यांच्या पाठिशी राहील, असे वानखेडे यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !