अंडरपासवर शहरातील कोरोना योद्ध्यांचा शिलालेख उभारा


भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ.नि.तु.पाटील यांची प्रशासनाकडे मागणी

भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील कोणत्याही एका उड्डानपूलावर कोरोना महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या करोना योद्ध्यांचा व त्यांच्या कार्याचा विचार करून शहीद कोरोना योध्या शिलालेख उभारुन एक आदर्श भुसावळ पॅटर्न उदयास आणावा, अशी मागणी भाजपचे वैद्यकिय आघाडीचे नाशिक विभागीय सहसंयोजक डॉ.नि.तु. पाटील यांनी केली आहे.

आदर्श पॅटर्न उदयास आणावा
डॉ.पाटील यांच्या निवेदनानुसार, भुसावळ शहरातील महामार्गाच्या अंडरपासला राष्ट्रपुरुषांचे नामकरण करण्याची मागणी होत आहे. या नामकरणांमुळे नक्कीच महापुरुषांच्या कार्याची आठवण होऊन प्रेरणा मिळते. त्यांचे विचार आत्मसात करण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. याबद्दल कोणाचेही दुमत नसेल आणि ते पुढील नवीन पिढीसाठी आदर्श ठरतात. पण यासोबतच आपण भुसावळ शहर ज्यांचे जन्मभूमी, कर्मभूमी आहे, ज्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्म करता-करता, जनतेची सेवा करता-करता, जागतिक करोना महामारीत कोरोना संक्रमणामुळे मृत्युमुखी पडलेल्या कोरोना योद्ध्यांच्या नावाने आपण एखाद्या उड्डाण पुलावर शीलालेख उभारावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. भुसावळ नगरपरीषद स्वच्छता कर्मचारी स्व.प्रकाश तुरकुले, स्व.विजय राजपूत, बाजारपेठ पोलीस स्टेशन मधील कर्तव्यदक्ष सहाय्यक फौजदार आनंदा सोनू गजरे, कर्तव्यदक्ष सहाय्यक फौजदार एजाज पठाण तसेच भुसावळ शहरातील वैद्यकीय, महसूल विभाग, शिक्षक, रेशन विभाग, वृत्तपत्रे वाटप आदी ेत्रांमधील जनतेची सेवा करता कोरोना महामारीमध्ये शहीद झाले असतील अशांची अग्रक्रमाने शिला लेखावर नावे लिहावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


भुसावळ पॅटर्न ऐतिहासीक ठरेल
अंडरपासवर शहरातील कोरोना योद्ध्यांचा शिलालेख उभाराशिलालेखामुळे कोरोना महामारीत योध्दा म्हणून सेवा दिलेल्या मृतांचे सदैव स्मरण राहील आणि हा एक आगळावेगळा भुसावळ पॅटर्न ऐतिहासिक ठरेल. कोरोना युद्धांचा, त्यांच्या कार्यांचा आणि त्याचा परीवाराचा आपण कुठेतरी सन्मान करत आहोत ही भावना प्रत्येक भुसावळकरांच्या मनामध्ये निर्माण होईल, असे भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !