फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी सावदा पोलिसांच्या जाळ्यात
सावदा : फसवणूक प्रकरणी यावल पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला सावदा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली आहे. सलीम सिकंदर तडवी (परसाडे, ता.यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी तडवी हा शनिवारी सायंकाळी बसस्थानक परीसरात सार्वजनिक ठिकाणी काही एक कारण मोठ-मोठ्याने आरडा ओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असल्याने त्यास सावदा पोलिसांनी ताब्यात घेत मुंबई पोलिस अॅक्ट 112/117 प्रमाणे कारवाई केली. आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याच्याविरुद्ध यावल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे व या गुन्ह्यात तो पोलिसांना वॉण्टेड असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आर.डी.पवार, हवालदार सपकाळे, रीजवान पिंजारी, संजीव चौधरी, सुरेश अढायगे, विशाल खैरनार यांनी केली.

