मुंबई-नवी दिल्ली वन-वे विशेष गाडी धावणार


भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई ते नवी दिल्ली दरम्यान एकमार्गी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 02177 ही गाडी 11 रोजी मुंबई येथून रात्री 11.30 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिशी दुपारी 03.30 वाजता नवी दिल्लीला पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, ग्वालियर, आग्रा कान्ट स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 15 द्वितीय आसन श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहे. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !