मैत्रेय कंपनीच्या गुंतवणूकदारांना दिलासा : मंगळवारी मंत्रालयात बैठक
जळगाव : गेल्या काही वर्षांपासून मैत्रेय कंपनीत गुंतवणूक केलेल्या लाखो गुंतवणूकदारांना ठेवीच्या रकमा परत मिळण्याची आस लागली असून गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांचे अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, 12 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता मंत्रालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मैत्रेय कंपनीच्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीला पाचोर्याचे आमदार किशोर पाटील यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उप आयुक्त (मुंबई), यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आमदारांकडून सातत्याने पाठपुरावा
राज्यातील बहुतांशी नागरिकांनी मैत्रेय कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. मैत्रेय कंपनीने कोणत्याही स्वरुपाचा परतावा गुंतवणूकधारकांना दिला नसल्याने या संदर्भात आमदार किशोर पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.


