लग्नात नाचतांना धक्का लागल्याने वाद : कुर्‍हेपानाचेत एकाचे डोके फोडले


भुसावळ : लग्नात नाचतांना धक्का लागल्याने वाद उद्भवल्याने संतापाच्या भराचे एकाचे डोके फोडण्यात आल्याची घटना गुरुवारी
दुपारी 2.45 वाजता घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कुर्‍हा पानाचे येथील लोहार यांच्या मुलीच्या लग्नात दीपक सुपडू भोई हे नाचत असताना त्यांचा धक्का विशाल कोळी यांच्या भावाला लागला होता. या कारणावरून गुरुवारी दुपारी 2.45 वाजता दीपक व त्याचा मित्र सागर हे लघूशंकेसाठी गेले असता विशाल ईश्वर कोळी यांनी आपल्या भावाला धक्का का दिला? असा जाब दीपक भोई यांना विचारत त्यांच्या डोक्यात काठीने वार केला. दीपक यांचे डोके फुटले असून हातही फ्रॅक्चर झाला आहे. दीपपक सुपडू भोई (रा. कुर्‍हा पानाचे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल ईश्वर कोळी (रा. कुर्‍हा पानाचे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अमोल पवार पुढील तपास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !