नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताला शैक्षणिक महासत्ता बनवेल
माजी प्राचार्य अनिल राव : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत कार्यशाळा
भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, भुसावळ व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत ‘विस्तार कार्यक्रम’ कार्यशाळेच्या दुसर्या दिवशीच्या सत्रात 9 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता उच्च शिक्षणाचे गाढे अभ्यासक व माजी प्राचार्य अनिल राव यांनी ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’यावर ऑनलाईन मार्गदर्शनपर संबोधन केले.
सकारात्मक बदल अपेक्षित
अनिल राव म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात सतत बदल अपेक्षित आहे. सक्रिय बदलास समोर जाऊन भविष्यात योग्य दिशा देणे हे ठरविले आहे. जगात उच्च शिक्षणात बदल हाच स्थिर शब्द आहे. समाज शिक्षकाकडे पाहतो, सकारात्मक बदल अपेक्षित आहे, सर्वांसाठी समानतेचे, उत्कृष्ट शिक्षण, निरंतर अध्ययनाच्या समान संधी सर्वांसाठी उपलब्ध होतील, असे धोरण 193 देशांनी स्वीकारले आहे. यासाठी 12 उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यात दर्जात्मक महाविद्यालये व विद्यापीठे तयार करणे, शैक्षणिक शासन व विद्यापीठ संस्था यांच्या मान्यता हळूहळू कमी करून त्यांना स्वायत्तता देणे, समग्र व बहुविध शास्त्रीय शिक्षण यात विविध विषय एकत्र शिकता येती.

नवीन बदल स्वीकारायला हवेत
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, नवीन शिक्षणातील होणारे बदल स्वीकारले पाहिजे त्यामुळे विद्यार्थी व समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास होईल व बहू आयमी व्यक्तिमत्त्व तयार होतील, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.डॉ.संजय बाविस्कर तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागाचे चेअरमन प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, सदस्य प्रा.डॉ.शोभा चौधरी, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.अंजली पाटील, सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतल्याचे प्रसिध्दीप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी म्हणाले.

