दोन लाखांची लाच भोवली : बोदवडचे तहसीलदार निलंबित
बोदवड : दोन लाखांचे लाच प्रकरण बोदवडचे तत्कालीन तहसीलदार हेमंत पाटील यांच्या अंगलट आल्यानंतर आता थेट त्यांचे निलंबन करण्यात आले असून त्याबाबत जिल्हाधिकारी प्रशासनाला महसूल विभागाने काढलेले आदेश प्राप्त झाले आहेत. बोदवड तहसील कार्यालयाच्या हद्दीतील सातबारा उतारा तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर लावण्यासाठी तहसीलदार पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी संजय झेंडू शेरनाथ व तलाठी निरज पाटील यांना एसीबीच्या पथकाने 18 डिसेंबर रोजी दोन लाखांची लाच स्वीकारताना अटक केली होती. तहसीलदार पाटील याच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांनी राज्य शासनाला पाठवला होता.

